व्ही एन नाईक संस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनेलने गड राखला मात्र सिंह गेला
व्ही एन नाईक संस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनेलने गड राखला मात्र सिंह गेला
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला असून प्रगती पॅनलने बाजी मारली. सत्ताधारी क्रांतिवीर पॅनल व नव ऊर्जा पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

नाईक शिक्षण संस्थेची 2024 ते 2029 साठीची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पार पडली. 29 जागांसाठी 118 उमेदवार रिंगणात होते. प्रथमच चार पॅनलमध्ये निवडणूक झाली असून निवडणुकीसाठी सुमारे 82 टक्के मतदान झाले होते. प्रचारादरम्यान भ्रष्टाचार, गैरकारभार, संस्थेच्या दूरवस्थेसारख्या अाराेप-प्रत्याराेपांनीही ही निवडणूक गाजली.

या निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष, संचालक यांना पराभव पत्करावा लागला. प्रगती पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी होऊनही अध्यक्ष पदावर मात्र परिवर्तन पॅनलचे कोंडाजी मामा आव्हाड हे विजयी झाले.

त्यांनी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे व प्रगतीचे तानाजी जायभावे यांचा पराभव केला. कोंडाजी आव्हाड यांना २२३२, ॲड तानाजी जायभावे यांना २१०४ तर पंढरीनाथ थोरे यांना १९४९ मते मिळाली. सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक यांनी २५३२ मते मिळवत ते २४८ मतांनी विजयी झाले. सहचिटणीसपदी निवडून आलेले दिगंबर गिते यांना 2912 इतकी मते मिळाली. 

हेही वाचा >>>> पुन्हा हिट अँड रन...! अत्तर व्यावसायिकाच्या गाडीने दुचाकीस्वाराला उडवले ; कुठे घडली घटना? वाचा

विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेली मते)
विश्वस्त : प्रगतीचे दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९) परिवर्तनचे लक्ष्मण जायभावे (२२३५)

कार्यकारी संचालक
नाशिक तालुका व शहर
प्रगतीचे प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड(२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५) तर परिवर्तनचे गोकुळ काकड (२२२२)

सिन्नर
प्रगतीचे जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९)

निफाड
प्रगतीचे पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३), परिवर्तनचे उध्दव कुटे (२३३६)

दिंडोरी गट
प्रगतीचे शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०), परिवर्तन पॅनेलचे सुभाष आव्हाड (२३०४)
येवला 
प्रगतीचे रमेश नामदेव वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३)

नांदगाव : प्रगतीचे त्रंबक डोंगरे (२३५३), किशोर लहाने (२६०५)

महिला गट
प्रगती पॅनलच्या रेखा कातकडे (2551), नंदा भाबड (2416)
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group