मुंब्य्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी
मुंब्य्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी
img
Dipali Ghadwaje
ठाणे : घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे.  अशातच मुंब्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट घडला आहे. मुघल पार्क या इमारतीच्या ए विंगमध्ये एका भंगाराच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त  केला आहे. तसेच या घटनेत एक रिक्षा आणि एका चारचाकी वाहनांचा नुकसान झाले आहे. 

शनिवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंब्रा येथील चांदनगर येथे  गॅस सिलेंडरचा  स्फोट झाला. गॅस लिकेज झाल्याने भडका उडाल्यामुळे तीन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली  आहे. एका खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. 

दरम्यान घटनास्थळी गॅस सिलेंडरच्या लिकेज झाला असल्याची प्रशासनाने दिली आहे. या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,  पीकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group