महत्वाची बातमी : आता घरपोच मिळणार नाहीत गॅस सिलिंडर!  नेमकं काय आहे कारण?
महत्वाची बातमी : आता घरपोच मिळणार नाहीत गॅस सिलिंडर! नेमकं काय आहे कारण?
img
Dipali Ghadwaje
LPG वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. LPG चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असल्याचे पत्रात म्हटले आहे.

कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. उज्ज्वला योजनेच्या LPG सिलिंडर वितरणातही अडचणी येत आहेत. तीन महिन्यांत मागण्या मान्य न झाल्यास प्रदीर्घ संपावर जाण्याचा इशारा संघटनेने पत्रात दिला आहे.


अलीकडेच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. आता LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. तीन महिन्यांत वाढीव कमिशनसह मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

शनिवारी भोपाळ येथे झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बी. एस. शर्मा यांनी दिली. ते म्हणाले की, मागण्यांच्या सनदेसंदर्भातील प्रस्तावाला विविध राज्यांतील सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

LPG वितरकांच्या मागण्यांबाबत आम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. LPG वितरकांना दिले जाणारे सध्याचे कमिशन अतिशय कमी आहे आणि ऑपरेटिंग कॉस्टशी सुसंगत नाही.

कमिशन वाढवण्याची मागणी

LPG वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी संघटनेने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. LPG चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असल्याचे पत्रात म्हटले आहे. परंतु, तेल कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. हे तात्काळ थांबवावे.

उज्ज्वला योजनेच्या LPG सिलिंडरवितरणातही अडचणी येत आहेत. तीन महिन्यांत मागण्या मान्य न झाल्यास प्रदीर्घ संपावर जाण्याचा इशारा संघटनेने पत्रात दिला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group