मोठी दुर्घटना ! गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग ; परिसरात एकच खळबळ
मोठी दुर्घटना ! गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग ; परिसरात एकच खळबळ
img
DB
मुंबई : धारावी येथे आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यानंतर एकामागे एक सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या तरी या आगीत कुठल्याची जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. पण या गाडीत मोठी वित्तहानी होण्याची शक्यता आहे. धारावी बस डेपोजवळ ही घटना घडली आहे.

धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत अचानक आग लागली. यानंतर गाडीत असलेल्या सिलेंडरचा एकामागे एक स्फोट झाले . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बस डेपोजवळच ही घटना घडली आहे. घटना घडली तिथे अनेकांकडून अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे अनेक दुचाकी आगीत जळूक खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे धारावीत खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group