मोठी दुर्घटना : फटाका कारखान्यात भीषण स्फोट , १७ जणांचा मृत्यू ; कुठे घडली घटना?
मोठी दुर्घटना : फटाका कारखान्यात भीषण स्फोट , १७ जणांचा मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje

गांधीनगर : गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला, त्यामुळे ही दुर्घटना घडली.

स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group