रायगड जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीतील केमिकल कंपनी स्फोट झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. दरम्यान या कंपनीत मोठा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की एक किलोमीटर परिसरात याचा आवाज आला. या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणा घटना स्थळी दाखल झाली असून बचावाचे काम सुरु आहे. रायगडच्या धाटाव एमआयडीसीत मोठा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती उघड झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. एक किलो मीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. या मोठ्या स्फोटामुळे धाटाव MIDC परिसरात घबराट पसरली आहे.
अग्नि शमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहे. या ठीकाणचा ढीगारा उपसून बचावाचे काम सुरु झाले आहे. साधन नायट्रो केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे.