डोंबिवलीत 45 केमिकल कंपन्यांना टाळे ठोकणार ;
डोंबिवलीत 45 केमिकल कंपन्यांना टाळे ठोकणार ; "हे" आहे कारण
img
Dipali Ghadwaje
अमुदान कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 बळी गेल्याच्या घटनेला अवघे 23 दिवस उलटतात तोच इंडो अमाईन आणि मालदे कंपनीत झालेल्या भीषण अग्नितांडवाने डोंबिवली पुन्हा हादरली. दरम्यान या घटनेनंतर शिंदे सरकारला खडबडून जाग आली असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज डोंबिवली एमआयडीसीतील 45 कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
 
प्रदूषण मंडळाने या सर्व कंपन्यांना क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत.डोंबिवली एमआयडीसीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अनेक दुर्घटना घडत असून आतापर्यंत कित्येकांनी आपला जीव देखील गमवावा लागला आहे. 

23 मे रोजी अमुदान कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन महिना उलटत नाही तोच बुधवारी सकाळी पुन्हा इंडो अमाईन या कंपनीला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, त्याची झळशेजारच्या मालदे कंपनीला बसली आणि ही कंपनीदेखील भस्मसात झाली. दैव बलवत्तर म्हणून सुमारे वीस कामगारांचे प्राण वाचले. 

मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट व आगीचे प्रकार सतत घडत असल्याने त्याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेऊन एमआयडीसीमधील 45 कंपन्यांना नोटिसापाठवल्या आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group