मोठी बातमी : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट, ८ जणांचा मृत्यू ; अनेक जण जखमी
मोठी बातमी : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट, ८ जणांचा मृत्यू ; अनेक जण जखमी
img
DB

आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला.

फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , या स्फोटामध्ये ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group