लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी : यंदा रक्षाबंधनला ओवाळणी मिळणार ; जुलै, ऑगस्टचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? वाचा
लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी : यंदा रक्षाबंधनला ओवाळणी मिळणार ; जुलै, ऑगस्टचा हप्ता खात्यात कधी जमा होणार? वाचा
img
Dipali Ghadwaje
जुलै महिना संपत आला तरी  अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रूपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींची रक्षाबंधन यंदाही आनंदात साजरी होणार असल्याचे दिसंतय.
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group