एमआयएम चा आणखी एक नगरसेवक अडचणीत ! काय आहे प्रकरण ?
एमआयएम चा आणखी एक नगरसेवक अडचणीत ! काय आहे प्रकरण ?
img
दैनिक भ्रमर


एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक आता अडचणीत आल्याची बातमी समोर येत आहे. TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी हिना खान हिला मदत केल्या प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना आता मालेगाव महापालिकेतील एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

अब्दुल मलिक यांच्यावर गोवंश तस्करीच्या आरोपा खाली किल्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मलिक यांच्या सवंदगाव येथील फॉर्महाऊस आणि इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदाम येथे छापा टाकले. त्यामध्ये सुमारे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे जप्त केली आहे.दरम्यान,  घराजवळ कारवाई सुरू असताना मलिक यांनी शासकीय कामात अडथळा आणत गोवंश जनावरे पळवून लावून स्वत: फरार झाले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही जनावरे विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

दुसरीकडे, हिना खानला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे मतीन पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांच्या घरावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या घरात हिना खान लपून बसल्याचा आरोप आहे, ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.महापालिकेने मतीन पटेल यांच्या घराला नोटीस बजावली असून, नारेगाव परिसरातील त्यांच्या दुसऱ्या घरालाही आणि कार्यालयालाही अतिक्रमणाची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांसोबतच महापालिकाही मतीन पटेल यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group