गुड न्यूज ! लाडक्या बहिणींना यावेळी दोन हप्ते सोबतच मिळणार, तारीख समोर आली
गुड न्यूज ! लाडक्या बहिणींना यावेळी दोन हप्ते सोबतच मिळणार, तारीख समोर आली
img
वैष्णवी सांगळे
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2 कोटी 42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1 कोटी 60 लाख महिलांनी केल्याचे महिला व बाल विकास विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या चार ते पाच दिवस आधी हा निधी वितरित होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी निधीची तरतूद आधीच करण्यात आल्याचेही समोर आले आहे. १४ जानेवारीआधी लाडक्या बहिणींना २ हफ्त्यांचे ३००० रुपये एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्य सरकारने या योजनेतील महिला लाभार्थ्यांची केवायसी अनिवार्य केली आहे. आतापर्यंत या योजनेतील २ कोटी ४२ लाख महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ६० लाख महिला लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे. केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. मात्र तोपर्यंत आणखी काही लाख महिलाच केवायसी करतील. त्यामुळे या योजनेतील सुमारे ५० ते ६० लाख लाभार्थी आपोआप कमी होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group