मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात.
मात्र अलीकडे काही विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला होता. ज्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला.
मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत, एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अक्षय तृतीयाला जमा होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळ म्हणाले, "शासनाचे पैसे आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांना मिळणारच आहेत. सरकार इतरही योजना राबवत आहेत. या योजनेचे पैसेही लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतात. लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे मिळण्यास कधी कधी उशीर होतो. पण योजनाच बंद हाईल, असे काहीही नसते.
आपली कमाई ठरलेली असते. जर रोजच्या खर्चातून एखादा मोठा खर्च जर झाला तर, इतर नेहमीच्या खर्चात ओढाताण होते. हे सर्व सामान्य जनतेला देखील ठाऊक आहे. पण सरकारचे पैसे मिळणारच कुठेही जाणार नाही. ते लाभार्थी जनतेच्या खात्यात जमा होतील", असे छगन भुजबळ म्हणालेत.
तसेच एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाला मिळतील असं सांगण्यात आलंय, तर लवकरच खात्यात जमा होतील", असंही छगन भुजबळ म्हणालेत.