दुर्दैवी...! तिने बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढले, अन् घरी परतताना काळाची झडप ; नेमकं काय घडले?
दुर्दैवी...! तिने बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढले, अन् घरी परतताना काळाची झडप ; नेमकं काय घडले?
img
Dipali Ghadwaje
नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला बँकेमध्ये गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. बँकेतून पैसे काढून घराकडे परत येत असताना महिलेवर काळाने घाला घातला. बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार , नंदूरबारच्या नवापूरमध्ये अपघाताची ही घटना घडली. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडले? 

वसनीबाई गावित या महिलेने लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांच्या बँकेच्या खात्यमध्ये या योजनेचे पैसे आले होते. हेच पैसे काढण्यासाठी त्या नवापूर शहरात असलेल्या बँकेमध्ये गेल्या होत्या. बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर त्या पुन्हा घराच्या दिशेने निघाल्या होत्या. त्या नवापूरवरून वडकळंबीला दुचाकीवरून जात होत्या. यावेळी भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातामध्ये वसनीबाई गावित यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी तात्काळ नवापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गुजरातला हलवण्यात आले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

वसनीबाई गावित यांच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. पती नसल्याने आईवरच दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी होती. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करत होत्या. सदर घटनेने वळकळंबी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर गुजरात राज्यातील व्यारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group