राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी बाकी होते त्या महिलांना आता ई-केवायसी करण्यासाठी अखेरची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना मोठा फायदा होत आहे. ई-केवायसी करणे गरजेचे असल्याने पात्र महिलांनी ई-केवायसी केली मात्र तांत्रिक अडचणीमुळे महिलांकडून चूक झाली ज्यामुळे त्यातील पात्र महिलांचा लाभ बंद झाला होता त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते.
अखेर महिला व बाल विकास विभागानं ई-केवायसीचं पोर्टल पुन्हा सुरु केलं आहे. आजपासून या पोर्टलवरुन ई-केवायसी दुरुस्ती ३१ मार्चपर्यंत करता येणार आहे. लाडकी बहीण ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. या निर्णयामुळं लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.