लाडक्या बहिणींसाठी खुशखबर !आता खात्यात थेट ''इतकी'' रक्कम होणार जमा ?
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर !आता खात्यात थेट ''इतकी'' रक्कम होणार जमा ?
img
दैनिक भ्रमर


लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ताच मिळालेला नाहीये. त्यामुळे हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. याच हप्त्याच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्यापासूनचा हप्ता अद्याप मिळालेला नाहीये. आता मे महिना उजाडला आहे आणि अद्याप मार्च महिन्यापासूनचा लाभ रखडला आहे. त्यामुळे हप्त्याचे पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहे. पण आता लाडक्या बहिणींना एकाच वेळी हप्त्याचे 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या तांत्रिक पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा केला जाणार आहेत. पुढील आठवड्याभरात हप्त्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.नेमके किती रुपये मिळणार?

लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार की मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group