लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी !  'या' महिलांच्या खात्यात आता थेट 6000 रुपये ?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! 'या' महिलांच्या खात्यात आता थेट 6000 रुपये ?
img
Nandini khandare More

लाडक्या बहिणींसाठी आता एक खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट  6000 जमा होणार असल्याची अपडेट आली आहे. या बातमी महिलांसाठी खुशखबर ठरली असून आता नेमकं कोणत्या महिलांना 6000 मिळणार आणि का मिळणार हे जाणून घेऊया. 

 परंतु ई-केवायसी करूनही काही महिलांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणींना एकूण चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांपासून ज्या पात्र महिलांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांना आता एकदाच 6000 रुपये दिले जाऊ शकतात. 

एकीकडे ई-केवायसीमुळे एकूण 80 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. दुसरीकडे ई-केवायसी करूनही काही महिलांना चार-चार महिन्यांचे पैसेच आलेले नाहीत. याच महिलांसाठी ही खुशखबर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार चार महिन्यांचे पैसे न आलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता दोन टप्प्यांत 6000 रुपये पाठवले जाऊ शकतात. फेब्रुवारी-मार्च महिन्याचे 3000 आणि एप्रिल-मे महिन्याचे 3000 रुपये अशा महिलांना मिळू शकतात. 

दरम्यान, पात्र महिलांना याआधीच्या चार महिन्यांचे पैसे दोन टप्प्यांत दिले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. याबाबत सरकारने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सरकारने याबाबतची अधिकृत माहितीदेखील अद्याप दिलेली नाही. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group