महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे , अशा राज्यातील महिलांना दर महिन्याता १५०० रुपये देण्यात येतात. गेल्या वर्षी म्हणजे जुलै मध्ये सुरू झालेल्या योजनेचा आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक महिन्यांना लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतात.
मात्र नोव्हेंबर महीना सुरू होऊन संपायला आला, आज २० तारीख उजाडली तरी राज्यातील लाडक्या बहिणींना अद्याप या महिन्यात हप्ता मिळालेला नाही. या महिन्याचे १५०० रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही. त्याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचे, या महिन्याचे पैसे मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याची अधिकृत तारीख काही अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे हे पैसे कधी मिळतात याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.