लाडकी बहीण योजनेबद्दल महायुतीच्या ''या'' मंत्र्याने  दिले ''हे '' मोठे संकेत
लाडकी बहीण योजनेबद्दल महायुतीच्या ''या'' मंत्र्याने दिले ''हे '' मोठे संकेत
img
दैनिक भ्रमर
राज्यसरकारची बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना हि सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला असून  महायुती सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार असे घोषित या केलेलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या नवीन निकषानुसार आता लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळणाऱ्या महिलांची संख्या 9 लाख इतकी झाली आहे. त्यामुळे सरकारचे 945 कोटी रुपये बचत होणार आहेत. त्यातच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेत कोणाचीही रिकव्हरी केली जाणार नाही”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ज्यांना सबसिडीची गरज नाही त्यांनी सबसिडी सोडावी, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर लाखो लोकांनी सबसिडी सोडली होती. अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. यामध्ये ज्यांनी निकषात न बसता योजनेचा लाभ घेतला, त्यांनी ही योजना सोडून दिली पाहिजे. स्क्रूटिनी करणे हे सरकारचे काम आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

“लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाकडूनही रिकव्हरी करण्यात येणार नाही. जर एखाद्या लाडक्या बहिणीने निकषात न बसतानाही लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतः लाभ घेणं सोडून दिलं पाहिजे”, असेही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.

“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राच अत्यंत महत्त्वाचं बजेट मांडलं. आपल्याकडे 12 तास असलेल्या उन्हापासून सोलर प्लांट माध्यमातून वीज निर्मिती तयार करणे. 4.4 टक्के वित्तीय तूट भरून आणण्यासाठी प्रयत्न करणे हे त्यात आहे. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी तो अर्थसंकल्प होता. भारतातील अर्थव्यवस्था ही जगातील तीन अर्थव्यवस्थेमधील असली पाहिजे अशा प्रकारचा अर्थसंकल्प होता, त्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि 12 लाखांपर्यंतचा इन्कम टॅक्सपासून सूट देण्यात आली”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group