लाडक्या बहिणींना  धक्का !  ''या'' खासदाराने केले मोठे विधान
लाडक्या बहिणींना धक्का ! ''या'' खासदाराने केले मोठे विधान
img
दैनिक भ्रमर
राज्यसरकारच्या बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाखो महिलांना फायदा झाला असून. विधासभा निवडणुकीत हीच योजना गेमचेंजर ठरली असल्याची चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान,  विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप हे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्याच आता काँग्रेस खासदाराने लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठे विधान केले आहे. काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी त्यांना लाडकी बहिण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कल्याण काळेंनी प्रतिक्रिया दिली. “लाडकी बहिण योजना मतं खरेदी करण्यापुरती होते. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मारलेला डल्ला आणि त्याच तिजोरीवरून आपल्या स्वतःसाठी मतं खरेदी करण्याचं काम या महायुती सरकारने केलं”, असा हल्लाबोल खासदार कल्याण काळे यांनी केला. “लाडक्या बहिणी योजनेला फक्त गोंडस नाव दिले. त्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की ही योजना बंद होणार आहे”, असे विधान कल्याण काळेंनी केले. “हळूहळू या सरकारचे नाव युती सरकारऐवजी चौकशी सरकार असं नाव ठेवलं, तर योग्य होईल” असा टोलाही खासदार कल्याण काळे यांनी लगावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group