ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत लाडकीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
हा हप्ता कदाचित लांबणीवरदेखील जाऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात पैसे जमा होणार आहेत. जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाणार असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र दिले तर महिलांना ३००० रुपये मिळणार आहे.