मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला असून विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाईल अशी घोषणा करण्यात आली. दरम्यान आता लाडक्या बहिण योजने संदर्भात राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून या योजनेच्या निकषात आम्ही कोणताही बदल केलेला नाही असे मंत्री आदिती ठाकरे यांनी म्हटले आहे. ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वी प्रमाणेच लाभ मिळणार आहेत.
तसेच, लाडकी बहिण योजनेचे ऑगस्ट महिन्यात ७० ते ७५ हजार अपात्र ठरले होते अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात काही तक्रारी आल्याने हे अर्ज बाद केल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. लाभ्यार्थ्यांची संख्या कमी होणे हे अचानक घडलेले नाही. तक्रारी आल्याने हे झाल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. या योजनेचा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केला आहे.त्या निर्णयात कोणताही बदल आम्ही केलेला नाही.
माझी लाडक्या बहिणी योजना यशस्वी झाल्यामुळे विरोधकांकडून असा अपप्रचार केला जात आहे. परंतू ही छाननी सरकार आल्यानंतर झालेली नाही तर ती ऑक्टोबरमध्येही झाली होती. डिसेंबरमध्येही झालेली आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तक्रारींची स्क्रुटीनी सुरु आहे. आम्ही कुठल्याही गरजू महिलेचे नाव कमी केलेले नाही असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी केलेले आहे. योजनेसाठी जी महिला पात्र आहे या योजनेसाठी तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.