लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील २७ हजार ३१७ महिलांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रति महिना 1500 रुपये मिळण्याच्या अपेक्षेने महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले होते. जाचक अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभ मिळाला मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आले आहे. जून महिन्याचा हफ्ता देखील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही.
जून महिन्याचा हफ्ता देखील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही. आता महिलांचे अर्ज बाद करून लाभ देणे बंद करण्यात येत आहे.पूर्वीप्रमाणे दीड हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालयी असलेल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीट वाढली आहे. नवीन नोंदणी बंद असल्याने अर्ज करता येत नाही,अशात यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार 317 लाडक्या बहिणींचा पत्ता कट करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी निकषांमध्ये बसत आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या घरी घरी चारचाकी वाहन आहे. जे लाभार्थी आयकर दाते आहेत,नमो शेतकरी सन्मानचे लाभार्थी,संजय गांधी निराधार, एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सत्तावीस हजार 317 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले आहे.