लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! ''त्या'' महिलांना 10,500 रूपये  परत करावे लागणार?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का ! ''त्या'' महिलांना 10,500 रूपये परत करावे लागणार?
img
दैनिक भ्रमर
राज्यसरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी पर्यंतचे हफ्ते पात्र महिलांना प्रदान करण्यात आले आहे. दरम्यान, आता लाभार्थी महिलांची छाननी करण्यात येणार असल्याचा बातम्या समोर येत असल्याने लाडक्या बहिणींची धास्ती वाढली आहे. याच दरम्यान आता लाडक्या बहिणींना मोठा  धक्का बसणारी माहिती समोर येत आहे. 

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांची अर्जाची छाननी सूरू केली आहे. या छाननीमध्ये ज्या महिलांनी निकषांना डावलून योजनेचा लाभ घेतला आहे. त्या महिलांना योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे. यासाठी सरकार महिलांना आवाहन देखील करत आहेत. अशात आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला आणखीणच वेग दिला आहे. त्यानुसार आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी पाठवणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या या पडताळणती जर महिला निकष डावलून लाभ घेत असल्याचे समोर आले तर त्यांना आतापर्यंत खात्यात आलेले 10 हजार 500 रूपये सरकारला परत करावे लागणार आहे. 

या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभाग महिलांच्या पैशांचे विवरण सांगणार आहे. तर परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरात चारचाकी आहे की नाही? याची माहिती देणार आहे. या दरम्यानच आता सरकारने अर्जांच्या छाननीला आणखी वेग दिला आहे.सरकार आला थेट अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे.

चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. या संदर्भात सरकार परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवत होती. त्यानंतर आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत जर महिलांच्या कुटुंबात चारचाकी असेल त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांना मोठा धक्का बसणार असून त्यांना योजनेचे पैसे परत करावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सासरे, दीर, अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेला योजनेचा लाभ सूरूच राहणार आहे.

दरम्यान,  आता महिलांना फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या 1500 रूपयांची प्रतिक्षा आहे. हे पैसे कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान हे पैसे खात्यात येईपर्यंत जर अर्ज बाद झाला तर सर्व पैसे परत करावे लागण्याची शक्यता आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group