उरला अवघा एक दिवस ! ...नाहीतर १ कोटी महिलांना मिळणार नाही ₹१५००
उरला अवघा एक दिवस ! ...नाहीतर १ कोटी महिलांना मिळणार नाही ₹१५००
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या  लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. 

दरम्यान, आतापर्यंत जवळपास १ कोटी १० लाख महिलांचे केवायसी बाकी आहे. केवायसी करण्यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. केवायसीमुळे त्यांचा लाभ बंद होणार असल्याची भीती लाभार्थी महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

आता केवायसी पूर्ण करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहे. यामध्ये १ कोटी महिलांचे केवायसी होणे अशक्य आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे गरजेचे आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group