लाडकी बहीणनंतर
लाडकी बहीणनंतर "ही" नवीन योजना ; महिलांना दरमहिना मिळणार "इतके" रुपये ; जाणून घ्या
img
DB
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात प्यारी दीदी योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये मिळणार आहे. काँग्रेस जर दिल्ली विधानसभा निवडणुक जिंकली तर राज्यातील महिलांना पैसे दिले जाणार आहेत.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष जाहिरनामा जाहीर करत आहे. यामध्ये निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षात काय कामे करणार, याबाबत माहिती दिलेली असते.

आज काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहेत. त्यात महिलांसाठी खास योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर प्यारी दीदी योजना राबवणार आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहे.

याआधीही आप पक्षाने महिलांसाठी खास योजना राबवणार असल्याचे आश्वासन दिले होते. दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजना राबवणार असल्याचे सांगितले आहे.

या योजनेत महिलांना १००० रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान, आप पक्षाच्या जाहिरनाम्यानंतर आता काँग्रेसनेही महिलांना २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group