लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिना सुरु होणार आहे. अशात लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
मात्र, एप्रिल महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांच्या तपासणीची प्रक्रिया सुरु आहे.या योजनेत चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. ही माहिती परिवहन विभागाच्या मदतीने गोळा करण्यात आली आहे.
दरम्यान, आता महिलांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडे मागवण्यात आली आहे. मात्र, आयकर विभागाने अद्याप महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही.
त्यामुळे ही पडताळणी होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. महिला व बालविकास विभागाने २ महिन्यांपूर्वी आयकर विभागाकडे २.६३ लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती.
आयकर विभागाने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असा नियम आहे. परंतु हा नियमात न बसतानाही अनेक महिलांनी लाभ घेतला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही पडताळणी सुरु आहे. मात्र, अद्याप ही तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लाभ मिळेल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित एप्रिल महिन्याचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.