आनंदाची बातमी : लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात ; वाचा सविस्तर
आनंदाची बातमी : लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

दरम्यान, कालपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावतर महिलांना एप्रिलचे १५०० रुपये देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

कालपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ५०० रुपये दिले जात आहे.

मध्यंतरी आदिती तटकरेंनी लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी देणार याबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्यापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात १५०० रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार फक्त ५०० रुपये 

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना १५०० रुपये तर काही महिलांना ५०० रुपये दिले जाणार आहेत. ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. तसेच नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. 

या महिलांना मिळणार नाहीत पैसे 

 लाडकी बहीण योजनेत फक्त लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचे निकषात पात्र असेल त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. या योजनेची लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला सरकारी नोकरीत कार्यरत नसावी. याचसोबत महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group