मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, नवीन तारीख काय ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, नवीन तारीख काय ?
img
वैष्णवी सांगळे
लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ईकेवायसी प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या महिलांचे केवायसी अद्याप पूर्ण झाले नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती राहिल्या आहेत, आता त्यांना सुधारणा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.



 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होती. आता ही मुदत एक महिन्यानं वाढवण्यात आली आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनं मुदतवाढ देण्यात येत असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलं. 

दरम्यान पुढे बोलताना त्यांना अशोक खरातबद्दलही प्रतिक्रिया दिली. भोंदू अशोक खरात प्रकरणावरुन केली जाणारी टीका अतिशय दुर्दैवी आहे. मी ज्यावेळी हे प्रकरण झालं तेव्हा सर्व प्रथम प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी मी एक होते, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केलेली आहे. एसआयटीच्या प्रमुख अनुभवी महिला पोलीस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. ज्या महिलांवर अन्याय झाला, पीडित महिलांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group