ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली होती, तर जुलैचा हप्ता ऑगस्टच्या अखेरीस देण्यात आला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी मिळणार का? असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. मात्र याचदरम्यान आता लाडक्या बहिणींची दिवाळी गॉड होणार असल्याची अपडेट आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मात्र, २५ ते २८ ऑक्टोबरदरम्यान याबाबत सरकारकडून जीआर (GR) प्रसिद्ध झाला नाही, तर ऑक्टोबर अखेरपर्यंत हप्ता मिळण्याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये एकत्र जमा करण्याची शक्यता आहे. कारण नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण असल्याने महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिला जाऊ शकतो.
दिवाळी गोड करण्यासाठी सरकार लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा सन्मान निधी एकत्र देण्याचा विचार करू शकतो, असे सांगितले जात आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद झाला आहे. सध्या सर्व महिला सप्टेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार ऑक्टोबर अखेरीस १,५०० रुपये देणार की दिवाळीच्या तोंडावर एकत्र ३,००० रुपये देणार, याचीच चर्चा सध्या महिलांमध्ये रंगली आहे.