मोठा झटका ! आणखी ५ लाख लाडक्या बहिणींचा १५०० रुपयांचा हफ्ता बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
मोठा झटका ! आणखी ५ लाख लाडक्या बहिणींचा १५०० रुपयांचा हफ्ता बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?
img
Nandini khandare More
राज्यातील बहुचर्चित लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच वादाचा विषय बनलेली असून आता या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी सुरु असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. राज्यभरातील जिल्ह्यांमधून अपात्र लाडक्या बहिणींची यादी समोर येत आहे. अशातच सोलापूरमधील जवळपास ५ लाख लाडक्या बहिणींना झटका बसला आहे. या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. निकषांनुसार अपात्र ठरलेल्या या लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये हफ्ता येणं आता कायमचं बंद झाले आहे.

रायगडमधील लाडक्या बहिणींना देखील मोठा झटका बसला. जिल्ह्यातील ५० हजार लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा हफ्ता येणं बंद झाले आहे. यामधील अनेक लाभर्थी महिलांचे वय ६५ वर्षे झाले असल्यामुळे त्यांचे ना योजनेतून वगळण्यात आले. या लाभार्थी महिसांना का अपात्र ठरवण्यात आले. पैसे येणं अचानक बंद झाल्यामुळे लाडकींचे टेन्शन वाढले.

गेल्या दोन वर्षांत ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी अद्याप लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. ज्या महिलांचे वय ६५ वर्षे पूर्ण झाले आहे त्यांची नावे या योजनेमधून आपोआप वगळली जात आहेत.पण ज्या तरुणी आणि विवाहित महिलांचे वय २१ वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना या योजनेचा लाभ हवा असेल तर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे २१ वर्षे पूर्ण झालेल्या अनेक लाडक्या बहिणी चिंतेत आल्या आहेत. कारण त्यांना देखील लाभ मिळणं बंद झाले आहे.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सरकारकडून सर्व लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये पाठवण्यात आले. पण नंतर या योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. या ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक लाभार्थी महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली. त्यांचे १५०० रुपये हफ्ता येणं बंद झालं. आतापर्यंत राज्यातील ८२ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. तर उर्वरीत लाभार्थी महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group