राज्यातील बहुचर्चित मुख्यामंत्री योजनेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून ८० लाख महिला अपात्र ठरवलय असून यावरून आता महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान काही महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याने लाभार्थींमध्ये चिंता निर्माण झाली होती. दरम्यान आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, योजनेतून काही नावे कमी झाल्याचा अर्थ त्या महिलांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात आले आहे, असा होत नाही. तांत्रिक अडचणी, अपूर्ण कागदपत्रे किंवा माहितीतील त्रुटींमुळे काही अर्ज तात्पुरते प्रलंबित ठेवण्यात आले असू शकतात.
सरकारकडून अशा अर्जांची पुन्हा सविस्तर तपासणी केली जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळतील त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या योजनेमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही समाजातील तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या कल्याणासाठी राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश केवळ गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे,” असे बावनकुळे म्हणाले.