काय ? लाडक्या बहिणींना आता थेट 3000 रुपये मिळणार ? काय आहे अपडेट
काय ? लाडक्या बहिणींना आता थेट 3000 रुपये मिळणार ? काय आहे अपडेट
img
Nandini khandare More

जुलै महिना सुरू झाला असून अद्यापही  महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे  जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळेच जून महिन्यासोबतच जुलै महिन्यांच्या लाभाचाही महिलांना प्रतीक्षा लागली आहे. हे पैसे कधी बँक खात्यावर येणार असे विचारले जात आहे.याचदरम्यान आता हा संभ्रम दूर करणारी बातमी आता समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 12 ते 15 तारखेपर्यंत दिले जातील. हा फक्त अंदाज आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर जुलै महिन्याच्या पैशांबाबत अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही. म्हणजेच जून आणि जुलै महिन्याचे पैसे महिलांना एकत्रित मिळणार की नाही, याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. सध्यातरी फक्त जून महिन्याचेच पैसे दिले जातील असे सांगितले जात आहे..

इतर बातम्या
Join Whatsapp Group