राज्यात पुन्हा एकद महायुतीचे सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान , याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतुद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.दरम्यान, आता लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे.
आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.