लाडक्या  बहिणींसाठी  आनंदाची  बातमी ! डिसेंबरचा हफ्ता  ''या''  दिवशी खात्यात जमा होणार
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! डिसेंबरचा हफ्ता ''या'' दिवशी खात्यात जमा होणार
img
दैनिक भ्रमर
महायुती सरकारकडून  लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झाली. जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली.  जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये  जमा करण्यात आले आहेत. त्यांनतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली. मात्र पुन्हा एकदा आता आचारसंहिता संपताच डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडेबहिणींचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.  ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.  याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुले किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अजून एकही रुपया मिळाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group