लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तरतूद मंजूर होण्याची  शक्यता ?
लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तरतूद मंजूर होण्याची शक्यता ?
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला भरभरून यश मिळाले आहे. दरम्यान, राज्यात पून्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले असून लाडक्या बहिणींना डिसेंबर  महिन्याचा हफ्ता लवकरच  देण्यात येईल अशा चर्चा होत्या.  दरम्यान,  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी, यासंदर्भात राज्यातील लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 'लाडक्या बहिणीं'ना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध योजनांसोबतच 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे. तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम ! विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि यासंदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील 'लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group