अर्धा महीना उलटून गेला तरी…लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
अर्धा महीना उलटून गेला तरी…लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेमचेंजर ठरली होती.  महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52  लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे.

आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. 

राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेत का हे पाहावं लागणार आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्य देखील चर्चेत आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते चर्चेत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वत:हून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही.

आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वत: हून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं म्हटलं होतं.  दरम्यान, लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. 

2100 रुपये अर्थसंकल्पानंतर? 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500 च्या जागी 2100 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळं राज्य सरकारचा अर्थसंकल्प  सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group