लाडक्या बहिणींनो मोबाईल चेक करा; पैसे जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींनो मोबाईल चेक करा; पैसे जमा होण्यास सुरुवात
img
वैष्णवी सांगळे
जुनं वर्ष सरून २०२६ चं नववर्ष उजाडलं असून या नव वर्षात राज्यातील लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींना मिळणारे १५०० रुपये खात्यात जमा झाले नव्हते. मात्र आता याचसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या’ लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरूवात झाली असून त्यांच्या खात्यात एका महिन्याचा हप्ता, म्हणजेच १५०० रुपये जमा झाले आहेत. 

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं सांगितलं जात होतं. तर जानेवारी महिन्याचा  देखील हफ्ता एकत्र मिळेल अशी अपेक्षा होती,  नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होतील, असा अंदाज बांधला होता, मात्र पात्र महिलांच्या बॅंक खात्यात १५०० रूपयांचा एक हफ्ता जमा झाला आहे. 

वर्षाच्या सरतेशेवटी सरकराने लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार रुपयांवर खुश केलं आहे. एकीकडे डिसेंबर महिना भरुन पडलेला असताना केवळ नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिल्याने बहिणींचा काहीसा अपेक्षाभंग झाल्याचं चित्र आहे. पण नोव्हेंबरचा हफ्ता खात्यात आल्याने महिला तशा खुश आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख काल (३१ डिसेंबर) होती. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group