लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. महिना संपत आला आहे त्यामुळे महिला जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहे. महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जूनचा हप्ता कधी येणार असं सर्वजण विचारत आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. परंतु सध्या लाभार्थी असलेल्या अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. याबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहे. या निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांना महिलांच्या नावाखाली लाभ घेतले आहे. बोगस कागदपत्रे बनवूनदेखील योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच अनेक बांग्लादेशी महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. बनावट आधार कार्ड आणि माहिती देऊन अकाउंट ओपन केले आहे. या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलाच लाभ घेऊ शकतात. त्यामुळे या महिलांना बाद केले जाणार आहे.
उत्पन्नाची पडताळणी
या योजनेत फक्त त्याच महिला लाभ घेऊ शकतात ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे. जर यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.