लाडक्या बहिणींची संक्रांत गोड ! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात
लाडक्या बहिणींची संक्रांत गोड ! लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरूवात
img
वैष्णवी सांगळे
लाडक्या बहिणींची संक्रांत गोड  झाली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.

लाडकी बहीण योजनेत आजपासूनच १५०० रुपये जमा झाले आहेत. सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत. उद्यापर्यंत सर्व महिलांना पैसे दिले जाणार आहेत. याआधीच अनेक मंत्र्यांनी घोषणा केली होती. मकरसंक्रांतीला महिलांच्या खात्यात ३००० रुपये येतील, असं सांगितलं होतं. मात्र, त्यातील एकच १५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये थोडी ख़ुशी थोडा गम असल्याचं पहायला मिळतंय. 

पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊनदेखील पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये माहिती मिळणार आहे. याचसोबत बँकेत जाऊनदेखील तुम्ही पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group