राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. ते या हफ्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार , डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३००० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोरआली आहे.
लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत.