"..... तर लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळाले असते" ; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा
img
Dipali Ghadwaje
 'लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन जाहिरात बाजी केली. जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळाले असते.', अशी टीका नितीन बानगुडे यांनी सरकारवर केली. मिरज येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना  शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामान्यांचा आमदार असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले. मिरज विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली.

शिवसेना उपप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ दणक्यामध्ये ही सभा पार पडली. यावेळी महायुती सरकारवर टीका करण्यात आली.

दरम्यान, मिरज राखीव मतदारसंघातून भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते तानाजी सातपुते निवडणूक लढवणार आहेत. अशामध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते किती मदत करतात यावरच सुरेश खाडे विरूद्ध तानाजी सातपुते यांच्या विजयाची समीकरणे अवलंबून आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group