मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. २९ जून २०२४ रोजी ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान,आता योजनेला वर्षपूर्ती झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी खास पोस्ट केली आहे. ही योजना अशीच अखंडपणे सुरु राहणार आहे, अशी घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.
आदिती तटकरेंची पोस्ट
आदिती तटकरेंनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाश शिंदे यांच्या नेतृत्वात या क्रांतिकारी योजनेची अंबलबजावणी त्याच ताकदीने सुरु आहे. आज या योजनेला वर्षपूर्ती होत आहे. या योजनेनिमित्त महाराष्ट्राच्या गावागावात फिरले, लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला.
या योजनेमुळे महिलांना किती मोठा आधार दिला याची जाणीव झाली. या योजनेच्या रक्कमेतून कोणी मुलांना शिक्षण देत आहे तर कोणी व्यवसाय सुरु केला आहे. अनेक लाडक्या बहिणींना एकत्र येत मोठी ताकद उभी केली आहे. या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाची ज्योत घरोघरी नेता आली, ही अभिमानाची बाब आहे.
यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार, असं त्यांनी म्हटलं आहे.
आदिती तटकरेंची घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच जोमाने पुढे अखंडपणे सुरु राहणार, अशा अनेक यशोगाधा महाराष्ट्रातील गावागावात घडवणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे. आता थांबायचं नाय, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे ही योजना आता बंद होणार नाहीये.