लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे.
मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे. सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ नियमित मिळावा, हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.