लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : डिसेंबरचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार ; पहिल्या टप्पात
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : डिसेंबरचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार ; पहिल्या टप्पात "इतक्या" महिलांना मिळणार पैसे ? वाचा
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे.

त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे. लाडक्या बहिणांना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये त्याचेही स्पष्टीकरण झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले.

त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर अन् नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले होते.
 
डिसेंबरमध्ये 1500 रुपयांप्रमाणे मिळणार पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाने रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group