लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस सिलिंडर कधी मिळणार?
लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले; मोफत गॅस सिलिंडर कधी मिळणार?
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार आणि वर्षाला तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. या घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला; परंतु अजूनपर्यंत योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे 'लाडक्या बहिणीं'ना लाभाची प्रतीक्षाच आहे. 

गरीब व गरजू महिलांचे सक्षमीकरण व्हावे, तसेच त्यांना आरोग्य जपण्यासाठी आर्थिक साहाय्य लाभावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली. जुलै व ऑगस्ट महिन्याचे अर्थसाहाय्य महिलांच्या बँक खात्यात वळते करण्यात आले; परंतु त्यानंतर घोषणा केलेल्या मोफत सिलिंडरचा लाभ अजूनपर्यंत महिलांना देण्यात आलेला नाही.

सदर लाभ कधी मिळणार, याची प्रतीक्षा जिल्हाभरातील लाभार्थी महिलांना आहे. अनेक नागरिक गॅस एजन्सीत सिलिंडरबाबत चौकशी करीत आहेत. शासनाने लवकर मोफत सिलिंडर योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महिलांनी केली. 
 
लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे लाभाचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत दोन महिन्यांचा लाभ महिलांना थेट बैंक खात्यात वितरित करण्यात आलेला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group