नंदुरबारमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अधिकृतपणे पाठवला आहे. या राजीनाम्यात त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं नमूद केलं. त्यांची राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. तर, काही प्रभागांतील निवडणुका तसेच नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. अशा निवडणुकीच्या वातावरणात अशाप्रकारे राजीनामा येन मोठं धक्कयाचं मानलं जात आहे.
मात्र, नगरपालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वीच नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.