नंदुरबारमधून मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडाऱ्यातून १५०अधिक भक्तांना विषबाधा झालीये. बाळु मामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागलया. सध्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी रणाळे येथे बाळु मामाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. आलेल्या भाविकांनी भगर, आमटी आणि दूध हे पदार्थ खाल्ले. हे पदार्थ ज्यांनी ज्यांनी खाल्ले आहेत त्यांना त्रास जाणवत आहे.
मध्य रात्री अडीच ते तीनच्या सुमारास भाविकांना त्रास होण्यास सुरूवात झाली. उल्ट्या, जुलाब आणि मळमळणे असे त्रास अनेकांना होऊ लगाले. 150 हून अधिक जण रणाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात 55 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर असल्याचं प्रशासनाचं म्हणण आहे.