जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर ७१ जणांना विषबाधा झाली. अनेकांना ताप, उलटी अन् जुलाब , खोकल्याचा त्रास होऊ लागलाय. धाराशिवमधील उमरागा तालुक्यात मंगळवारी रात्री ही घटना घडली.
सर्व रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती सुधारत आहे तर काही जणांना उपचारासाठी दुसऱ्या रूग्णालयात हालवण्यात आले आहे. उमरगा तालुक्यातील कराळी येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांमध्ये जेवण केलेल्या ७१ जणांना विषबाधा झाला अन् गावात एकच गोंधळ उडाला.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात अनेकांनी जेवणावर ताव मारला. मंगळवारी रात्रीपासूनच त्रास व्हायला सुरूवात झाली, बुधवारी सकाळी अनेकांना जास्त प्रमाणात त्रास झाला.
त्यामुळे रूग्णालायत उपचारासाठी दाखल करावे लागले. काहींवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींवर खासगी रूग्णालयात उपचार केले जात आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी जेवण केले त्यांना हा त्रास व्हायला सुरुवात झाली, अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली.
उमरगा तालुक्यातील कराळी येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांमध्ये जेवण केलेल्यांना विषबाधा झालेल्या नागरीकांचा संख्या ७१ इतकी झाली.
तुतोरी येथील खासगी रुग्णालयात ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर मुळज रुग्णालयात १० आणि उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रुग्णांना ताप, खोकला, जुलाब, उलटी ही लक्षणे दिसत आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत, सध्या रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली.