१७ जानेवारी २०२४
मुंबईतील एका चांगल्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑनलाईन ऑर्डर केलं. ऑर्डर केलेलं जेवण आलंही, पण त्या जेवणात उंदीर निघाल्याचा किळसवाणाच प्रकार घडला आहे. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं.
मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटच्या पदार्थात मृत
उंदीर सापडल्याचा दावा पीडित या व्यक्तीनं केला आहे.
या घटनेनंतर ती व्यक्ती 75 तास रुग्णालयातच होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील
रहिवाशी असलेली एक व्यक्ती मुंबईतील वरळी परिसरात कामानिमित्त आली होती. त्यावेळी
भूक लागल्यानं या व्यक्तीनं मुंबईतील एका आलिशान
रेस्टॉरंटमधून शाकाहारी पदार्थ ऑर्डर केला होता. पण हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं
लागलं
संबधित पीडित व्यक्तीने पोलिसांत
तक्रार दाखल केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप एफआयआर
नोंदवण्यात आलेला नाही, असा दावाही पीडित व्यक्तीकडून
करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीनं ट्विटरवर एक ट्वीट करत याप्रकरणी मदतीची मागणी
केली आहे.
दरम्यान संबधित पीडित व्यक्ती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 8 जानेवारी 2024 रोजी प्रयागराजहून मुंबईत आला होती आणि त्या व्यक्तीनं बार्बेक्यू नेशनमधून शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर आली आणि व्यक्तीनं जेवण्यासाठी जेवणाचे डब्बे उघडण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यातील एका डाळीच्या डब्ब्यात मेलेला उंदीर आढळून आला. जोपर्यंत व्यक्तीला हा उंदीर दिसता तोपर्यंत फार उशीर झाला होता. ज्या पदार्थात मेलेला उंदीर आढळून आला, तो पदार्थ त्या व्यक्तीनं खाल्ला होता.
यामुळे व्यक्तीची प्रकृती खालावली होती आणि त्यासाठी तब्बल 75 तासांहून अधिक काळ त्याला रुग्णालयात अॅडमिट व्हावं लागलं होतं. तसेच,
याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केलेला
नाही.
Copyright ©2025 Bhramar