मराठी अभिनेता आणि 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत शिव ठाकरेचं घर अख्खं जळून खाक झालंय. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईतील कोलते पाटील वेर्वे बिल्डिंगमध्ये शिव ठाकरेचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये आग लागली. या आगीने घरातील वस्तू भक्ष्यस्थानी ल्याचं दिसत आहे. शिव ठाकरेच्या घराचं या आगीत मोठं नुकसान झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याच्या बिल्डिंगच्या बाहेर अग्निशमन दलाची गाडीही उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
आग लागली तेव्हा शिव ठाकरे घरी नव्हता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या घाटेंट तो थोडक्यात बचावला आहे. त्याच्या टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली असून यामध्ये अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं म्हटलं आहे.